गार्डनमध्ये आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह






गार्डनमध्ये आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
पनवेल दि.१२ (संजय कदम) : तळोजा फेज 1 सेक्टर १४ येथील गार्डनमध्ये एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. 



 सदर मयत इसमाचे अंदाजे वय ४० वर्षे असून त्याचा रंग सावळा, चेहरा उभट, उंची ५ फूट ४ इंच, नाक सरळ, केस काळे, व पांढरी दाढी आहे. या इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४१२३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक महादेव बडे यांच्याशी संपर्क साधावा.




थोडे नवीन जरा जुने