महिलेचा खून







फिर्यादीसही मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )महिलेचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ आरोपींना २४ तासांच्या आत न्हावाशेवा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फिर्यादी सलोनी ओमन हेरेंज वय ३८ वर्षे, धंदा गृहिणी, राह. रविंद्र घरत यांची चाळ, से.१५, शेलघर, ता. पनवेल जि.रायगड, मुळ राह जलतांडा, धानामुंजी, जि. कुटी, राज्य झारखंड ८ व मयत महिला अनिता उर्फ आमेरदकानी सरावनन नाडर, वय ३६ वर्ष या दि. १ एप्रिल रोजी रात्रौ २२.३० वा. फिर्यादीच्या घरी बसली असताना यातील मयत महिला व आरोपी क्र. १ यांचेमध्ये पुर्वी झालेल्या भांडणावरून आपसात बाचाबाची चालु होती.



 त्यावेळी आरोपीत क्र. १ यास मयत महिलेने तु इसका कोन लगता है, तुम क्यु यहाँ पे रहता है. असे बोलल्याने आरोपी क्र. १ यास सदर गोष्टीचा राग येवुन त्याने फिर्यादी यांचे घरामध्ये दरवाजास आडवण्यासाठी ठेवण्यात आलेली सिमेंटची विट (फेवर ब्लॉक) उचलुन त्याने मयत महिलेस मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी आरोपीत क्र. २ याने आरोपीत क्र. १ यास मदत करून मयत महिलेस इसको मार-मार' असे बोलुन त्यास सहकार्य केले. आरोपी क्र. १ हा मयत महिलेस मारहाण करीत असताना फिर्यादी या मध्यस्थी करीत असताना दोघीनांही जिवे ठार मारण्याच्या उद्देषाने आरोपी क्र. १ याने सिमेंट विट (ब्लॉक) ने मारहाण करून अनिता हिस निघृणपणे जिवे ठार मारले व फिर्यादी यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. ७८ / २०२३ कलम ३०२, ३०७, ३४ भा. दं. वि. प्रमाणे दि. ०२/०४/२०२३ रोजी ०९:०२ वा. गुन्हयाची नोंद करण्यात आलेली आहे. प्रस्तुत गुन्हयातील आरोपीत यांचेबाबत कोणतीही उपयुक्त माहिती उपलब्ध नसताना तसेच गुन्हयातील आरोपीत हे मोबाईल फोन वापरत नसल्याने त्यांना ताब्यात घेणे आव्हानात्मक होते, 




असे असताना गुन्हयातील आरोपीत यांचे बाबत गोपनिय माहिती काढुन प्रथम एका संशयीत आरोपीस ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर दुसऱ्या आरोपीचा शोध घेवुन तो त्याच्या मुळगावी झारखंड येथे पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास देखील २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या तपासात त्यांनी प्रस्तुत गुन्हा केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीत यांना दि. ०२/०४/२०२३ रोजी २१:२६ वा. अटक करण्यात आलेली आहे. सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त, श्री. संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त श्री. महेष घुर्ये, पोलीस उप आयुक्त, परि. २, श्री. पंकज डहाणे व सहा. पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग, श्री. धनाजी क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक इंगोले, सहा. पोलीस निरीक्षक, गणपत परचाके, सहा. पोलीस निरीक्षक, सुधीर निकम, पोहवा / १०२ भोसले, पोहवा / १३५२ बोराटे, पोहवा / ६४ राजपुत, पोहवा / २९४४ बिंदे, पोहवा / १९९७ जाधव, पोहवा / १९०९ बसरे, पोहवा / १९११ डाकी, पोहवा / २३३० वायगणकर, पोहवा / १९१० बोरसे व पोना/२२४० सपकाळ यांनी पार पाडली.


थोडे नवीन जरा जुने