नमो नमो मोर्चा भारत व सखी वूमन वेल्फेअरच्या वतीने खारघर मध्ये गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधक मोफत लसीचे आयोजन







पनवेल दि.०३ (वार्ताहर) : नमों नमों मोर्चा भारत व सखी वुमन वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने व भारतीय जनता पार्टी, खारघर मंडल यांच्या सहकार्याने ९ ते २० वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधक (HPV Vaccine) मोफत लसीचे शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरात 205 मुलींना प्रतिबंधक लस मोफत देण्यात आल्या. या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच कोकण म्हाडा मा. सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 



                 यावेळी पनवेल मंडल भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत, नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंग, संघटन महामंत्री व महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सदस्य सोपान उंडे पाटील, उपाध्यक्ष आर के दिवाकर, भारतीय जनता पार्टी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, मा. नगरसेवक प्रवीण पाटील, मा. नगरसेवक नरेश ठाकूर, मा. नगरसेविका नेत्रा पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष बिना गोगरी, उद्योग आघाडी अध्यक्ष मामा मांजरेकर, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, शिक्षक सेलचे संयोजक संदीप रेड्डी सर, अखिलेश चौबे, सुनील करपे, दत्ता तांबडी, अमित बुधई, शुभ पाटील, खारघर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, अजय विभांडिक, शैलेंद्र त्रिपाठी, अश्विनी भुवड, संध्या शारबिद्रे, प्रिया दळवी, स्मिता आचार्य, गीता चौधरी, बिना गोगरी, मीनाक्षी अंथवाल, निर्मला यादव, चांदणी अवघडे, शोभा मिश्रा, सायली विसपुते, दीपा ओझा, कुशाल शर्मा, राघव शर्मा, माधव शर्मा, संजय महाडिक यांच्यासह खारघर भाजप चे कार्यकर्ते, नमो नमो मोर्चा भारत व सखी विमेन्स वेलफेअर चे सदस्य व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


डॉक्टर सतीश करंडे व वैभव घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. धनंजया, डॉ.रुद्रा बिरारी, डॉ. निखिल भारंबे, डॉ. प्रिया, डॉ. राम क्षार, डॉ. विवेक तिवारी,अमित बोधाई, सिस्टर शितल कदम, प्रतीक्षा गुरव व जनरेशन स्कूलचा कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष शर्मा व सखी वूमन वेल्फेअर च्या डॉ. नीलम विसपुते, स्नेहल बोधई, नुसरत अन्सारी, शोभा मिश्रा, रिचल मेहता, प्रीती शर्मा, सिद्धी शर्मा, सोशल मीडिया चे संयोजक अजय माळी व सरचिटणीस दीपक शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.



थोडे नवीन जरा जुने