मंगळवारी सीकेटी महाविद्यालयात स्वायत्त पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

 




पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) येथे पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण  सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.  
          या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूर यांची तर प्रमुख पाहुणे एम. के. सी.एल. चे मुख्य मार्गदर्शक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक  विवेक सावंत यांची उपस्थिती असणार आहे. 



            या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे माननीय सदस्य आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. या प्रसंगी प्राचार्य  प्रो. डॉ. एस. के. पाटील आणि  आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध  विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबत उपस्थित राहणार आहेत.



या 

 पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. एम. ए. म्हात्रे, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. आय. उन्हाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव हे विशेष मेहनत घेत आहेत.


थोडे नवीन जरा जुने