सचिन लहू ठाकुर हिंदुस्तान रत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.







उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )श्री रत्नेश्वरी डान्स अकॅडमी जसखार उरण चे नृत्य दिग्दर्शक,आई तुझे देऊळ फेम सचिन लहू ठाकूर यांना नवी मुंबई येथे पार पडलेल्या दैदिप्यमान पुरस्कार सोहळ्यात नृत्य क्षेत्रात गेली 23 वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय खेळ भवन परिषद, डायनामिक युथ स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया यांच्यावतीने तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइज व फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 2023 सालाचा हिंदुस्तान रत्न राष्ट्रीय पुरस्कार व्यासपीठावरील मान्यवर श्रीमती शितल कुलकर्णी ( सहायक कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 



यावेळी व्यासपीठावर जयेश चौगुले (CEO -डायरेक्टर हिंदुस्तान रत्न नॅशनल अवॉर्ड कमिटी), डॉ. संजय मोरे (जनरल सेक्रेटरी ऑफ इंडिया नॅशनल फेडरेशन IBBFF आणि एशियन फेडरेशन AFBF तथा शिवछत्रपती पुरस्कार 2017 प्राप्त), जानवी पांडव मॅडम (फिटनेस मॉडेल तथा एथलीट, IFBBORO फिटनेस चॅम्पियनशिप विजेती व मेजर ध्यानचंद नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड प्राप्त ), प्रॉ. अमित कुमार दुबे ( भारतीय वायुसेना अनुभवी कॅप्टन ), विनोद मिस्त्री (लाईफ बिझनेस कोच अँड ट्रेनर ) आदी सिने, नाट्य, कला क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज खेळाडू, तज्ञ मंडळीच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी सर्व मान्यवरांनी सचिन ठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.




सचिन लहु ठाकूर हे उरण तालुक्यातील जसखार गावचे रहिवाशी असून गेली 23 वर्षे ते नृत्य क्षेत्रात डान्सर व नृत्य दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. 2022 रोजी सचिन ठाकूर यांना अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कारानी गौरविण्यात आले होते. आतापर्यंत सचिन ठाकूर यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही चॅनेलवर रिऍलिटी शो मध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली आहे. अनेक दिग्गज हिंदी - मराठी कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. सध्या प्रत्येक घरांमध्ये वाजत असलेला ‘आई तुझ देऊळ’ या गाण्याचे निर्माते नुत्य दिर्ग्दर्शक आणि लीड डान्सर म्हणून सचिन ठाकूर हे प्रसिद्ध आहेत.





       आजपर्यंत अनेक आगरी, कोळी, मराठी गाण्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. सचिन ठाकूर यांनी आजपर्यंत 3000 हुन जास्त विद्यार्थ्यांना नृत्याचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.तसेच सध्या ते युवा सामाजिक संस्था जसखार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक सामाजिक प्रश्नात पुढाकार घेऊन त्यांनी विविध समस्या मार्गी लावले आहेत.व त्यांची ही सामाजिक कार्याची घोडदौड सुरूच आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना “हिंदुस्तान रत्न राष्ट्रीय पुरस्कार- 2023" प्रदान करण्यात आल्याने नृत्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक सामाजिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सचिन ठाकूर यांचे कौतुक करत सचिन ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा राष्ट्रीय पुरस्कार सचिन ठाकूर यांनी श्री रत्नेश्वरी कलामंचचे सर्व आजी-माजी नृत्य कलाकार /विद्यार्थी तसेच आई-वडील व संपुर्ण परिवाराला समर्पित केला आहे.


थोडे नवीन जरा जुने