मशाल सामाजिक सेवा संस्था उरण पनवेल या संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.






19 भजनी बुवांना मशाल भूषण पुरस्कार देऊन केले सन्मानित.

उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )मशाल सामाजिक सेवा संस्था उरण पनवेल या सामाजिक संस्थे मार्फत समाजात आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात आले. समाजासाठी झटणाऱ्या अशा या मशाल सामाजिक सेवा संस्था उरण पनवेल या संस्थेचा बारावा वर्धापन दिन साई मंदिर साईनगर वहाळ येथे मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमात 19 भजनी बुवांचा मशाल भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.




यावेळी साई मंदिर वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या संस्थेत अनेक जेष्ठ मंडळी सुद्धा कार्यरत आहेत. अशा जेष्ठ अनुभवी व्यक्तींचा समाजाला निश्चितच मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. मशाल सामाजिक सेवा संस्था ही समाजात उत्तम पद्धतीने कार्य करीत असून मशाल सामाजिक संस्थेचे कार्य प्रेरणादायी व आदर्श आहे असे सांगत मशाल सामाजिक सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक करून रवीशेठ पाटील यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विविध मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ. प. निवृत्ती बुवा चौधरी हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख एन डी स्टुडिओ सी ओ नितीन देसाई, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, लायन्स क्लब नवी मुंबईडिस्ट्रिक्ट चेअरमन पर्सन स्पोर्ट्स क्लब - विजय पाटील, गोरक्षनाथ मंदिर अध्यक्ष मिलिंद पाटील, नवी मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका भारती कोळी, उत्तम कोळी, मोतीराम मढवी गुरुजी, गणेश पाटील,साईनाथ साळुंखे, धनाजी घरत, जगदीश पारींगे याचबरोबर विविध विभागातील भजनी कलाकार, भजन,गायक उपस्थित होते



.मशाल सामाजिक सेवा संस्था उरण पनवेलचे अध्यक्ष पदाजी पोशा कासुकर, संस्थापक नंदकुमार नरहरी ठाकूर, उपाध्यक्ष रामभाऊ कोळी, सचिव दत्तात्रय कोळी, खजिनदार अरुण पाटील याचबरोबर मशाल सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन दत्तात्रेय कोळी व आभार प्रदर्शन नरेश म्हात्रे यांनी केले.एकंदरीत मशाल सामाजिक सेवा संस्थेचा वर्धापन दिन साई मंदिर वहाळ येथे मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने