महाशक्ती अ‍ॅम्बुलन्स असोसिएशनची रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी आशिष घरत तर कार्याध्यक्षपदी मुकुंद कांबळे 
पनवेल / प्रतिनिधी 
  महाशक्ती अ‍ॅम्बुलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शरद कात्रजकर यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील सभासद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील कमिटी एकमताने मतदान आणि आवाजी प्रमाणे नेमण्यात आली.त्यामध्ये आशिष घरत (रायगड जिल्हाध्यक्ष), मुकुंद कांबळे (रायगड जिल्हा कार्याध्यक्ष), किशोर म्हात्रे (रायगड जिल्हा सचिव), अनिल चव्हाण (रायगड जिल्हा प्रसिध्दी प्रमुख), दिपक इंदुलकर (अलिबाग तालुकाध्यक्ष), सचिन तळकर (माणगाव तालुकाध्यक्ष), संजय ठाकूर (महाड तालुकाध्यक्ष), अमित गुजरे (खालापूरतालुका अध्यक्ष), कुणाल शिर्के (रायगड जिल्हा संपर्कप्रमुख) अशी नावे आहेत.
या मेळाव्यात महाशक्ती अ‍ॅम्बुलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे पदाधिकार्‍यांकडून मोलाचे सहकार्य मिळाले. 


यावेळी महाशक्ती अ‍ॅम्बुलन्स असोसिएशन रायगड जिल्हा अध्यक्ष आणी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष आणी रायगड जिल्हा यांनी संपूर्ण टिमचे आभार मानण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने