तहसीलदार संपाने गैरसोय









तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पत्र, सोमचारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात फरक पडल्याचे दिसत आहे. वास्तव्य दाखला, प्रतिज्ञा उत्पन्नाचा दाखला, शैक्षणीक दाखला, पेंशन योजना, अपंग यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा यांच्यासाठी लागणारी कागदपत्रे, महसूल तारखा, महसूल रॉयल्टी, कार्यकारी दंडाधिकारी म्हणून असलेले खटले यांना होणारा विलंब, विविध योजनांचे ओळखपत्र, जेष्ठ नागरिक ओळखपत्र अशी अनेक प्रकारची कामे खोळंबली आहेत.





ग्रामीण भागातील सर्व सामान्य माणसाला या संपाबाबत काहीही माहीत नसते, रोजच्या सारखा तो कार्यालयात आल्यावर त्याला माहिती मिळते. तोपर्यंत त्याचा कामाचा दिवस आणि आर्थिक नुकसान होते. राजपत्रित अधिकारी वर्ग २ हे पद मोठे असून अनेक प्रकारची जबाबदारी त्यांच्यावर असते, जेवढी जबाबदारी, जेवढे पडला महत्व त्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू नाही, यासाठी संघटना सन १९९८ पासून प्रयत्न करीत आहे असे नायब तहसीलदार यांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी राज्य सरकारी कर्मचारी यांचा सात दिवस संप झाला होता, त्यावेळी सामान्य जनतेला झालेली डाळ अजूनही गेली नाही, त्यामुळे या संपाने सामान्य जनतेची मोठी कुचंबणा होण्याची चिन्हे आहेत.





थोडे नवीन जरा जुने