विविध सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व विविध धार्मिक संस्था, संघटना यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.






उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंती उत्सव सोहळ्यातील पालखी मिरवणूक काढण्यासंदर्भात 4 एप्रिल 2023 रोजी कोकण ज्ञानपीठ विद्यालय उरण येथे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व महिला कमिटीच्या सदस्या यांची बैठक घेण्यात आली होती.


 हनुमान जयंती उत्सव सोहळ्या संदर्भात घेण्यात आलेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना व माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणारी पालखी अथवा मिरवणूक ही दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या मार्गानेच काढण्यात यावी. तसेच ती वेळेतच पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर नमूद कार्यक्रमासाठी आवश्यक त्या विभागाच्या परवानग्या घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाच्या बाबतीत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.


 असेही सांगितले. मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी अथवा मिरवणूकीच्या वेळी आक्षेपार्ह पोस्टर बॅनर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.असे संदीपान शिंदे यांनी सांगितले.विविध विषया संदर्भात यावेळी पोलीस प्रशासनातर्फे मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठकीसाठी उरण पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह पोलीस पाटील, शांतता मोहोल्ला व महिला कमिटीचे सदस्य उपस्थित होते



.गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन सर्वांना केले.सदरची बैठक सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पडली.


थोडे नवीन जरा जुने