पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह

पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह
पनवेल दि.२४ (संजय कदम) : पनवेल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे.                सदर इसमाचे अंदाजे वय ७० ते ७५ वर्ष असून त्याची उंची ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, वर्ण सावळा, डोक्यास केस काळे व पांढरे वाढलेले, दाढी वाढलेली तसेच त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर १७-१-९० असे गोंदविलेले आहे. सदर इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस नाईक उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने