पनवेल दि.१४ (वार्ताहर) : कंपनीच्या खात्यातून दुसऱ्या कंपनीच्या खात्यात हस्तांतरण करून कंपनीमध्ये १३ लाख रुपयेचा अपहार केल्याची घटना कळंबोलीत घडली आहे.याप्रकरणी कंपनीने कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कळंबोलीमधील सीजी डारसल कंपनीमध्ये आर्थिक वर्षाच्या अखेरीस आर्थिक व्यवहाराचे लेखा परीक्षण केले असता ३० जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान कंपनीच्या खात्यातून आर. एन. कॅरियर या कंपनीच्या खात्यावर १३ लाख ३५ हजार रुपये हस्तांतर करण्यात आल्याचे दिसून आले. संबंधित कंपनीशी कोणतेही व्यवहार सीजी डारसल कंपनीमार्फत केलेले नसताना व्यवहार सांभाळणाऱ्या एक व्यक्तीने ही रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली असल्याचा संशय कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एक कर्मचाऱ्याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
Tags
पनवेल