मनोहरशेठ भोईर आपल्या कार्याला सलाम - कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर याचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वानाच माहीत आहे, त्याचा एक आणखीन एक प्रत्यय पुन्हा एकदा आला ते असे की,उरण तालुक्यातील धाकटी जुई येथील अस्थमा पेशंट नरेश बापू घरत ह्या पेशंटला दोन वर्षापासून दम्याचा त्रास आहे, सतत दोन वर्ष हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते, कधी कधी महिन्यातून पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागत असे,
त्यांची पहिली ट्रीटमेंट जे जे हॉस्पिटलला होती तेव्हा त्यांचे ब्लॉकेज काढण्यात आले आणि नंतर पनवेल येथील धर्माधिकारी हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू केली, तेथील डॉक्टरांनी त्यांना सांगितले की पेशंटची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने त्यांना कायमस्वरूपी ऑक्सिजन मशीन लावायला लागेल म्हणजे 24 तासातून जवळ जवळ चार वेळा मशीन लावायची तर चार तास आराम, त्यांनी मशीन भाड्याने आणली त्याचे महिन्याचा भाडा चार हजार रुपये असे दोन महिने मशीन वापरली पण घरात कोणी कामाला नसल्याने मशीनचा भाडा भरणे शक्य नव्हते
म्हणून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याकडे या ऑक्सिजन मशीन साठी मागणी केली आणि त्यांनी त्वरित ही मागणी मान्य करून ही ऑक्सिजन मशीन स्वतः विकत घेऊन नरेश बापू घरत यांना भेट दिली.बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ही मशीन माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते पेशंटच्या नातेवाईकांना सुपूर्त करण्यात आली. यावेळी विंधणे ग्रामपंचायत सदस्य सुनिता नंदन घरत व कार्यकर्ते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले
की, आपण खरोखरच देवासारखे धावून येऊन या पेशंटला हे ऑक्सिजन मशीन देऊन मोलाचे सहकार्य केले आहात, तुमच्या या कार्याला आमचा सलाम! आम्ही सर्वजण तुमचे आभारी आहोत असे त्यांनी पत्राद्वारे आपल्या भावना माजी आमदार मनोहर भोईर यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत.यावेळी विधणे ग्रामपंचायत सदस्य सुनिता नंदन घरत, सुमती नरेश घरत, मनीषा नीलम घरत,नंदू बाळकृष्ण घरत, अंजली अजय म्हात्रे, कैलास हसुराम पाटील, प्रतिभा ज्ञानेश्वर म्हात्रे व कार्यकर्ते व कुटुंबीय उपस्थित होते.
Tags
उरण