पनवेल । वार्ताहर
ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या पुढाकाराने सिडकोच्या विकासकामांचे भूमीपुजन करण्यात आले.
या भूमीपुजन समारंभाप्रसंगी उपसरपंच सुनंदा हरीभाउ नाईक, माजी उपसरपंच निशा रत्नदिप पाटील, मनोज राम दळवी, अंजली राहुल कांबळे तसेच विश्वनाथ पाटील, विजय वाघे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव पाटील तसेच रत्नदिप पाटील, अनिल मेहेर, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल आणि राहुल कांबळे, दिलखूश दळवी, निता मनोज दळवी यांच्यासह महिला वर्ग पारगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या पुढाकाराने सिडकोकडून पारगाव गावातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमीपुजन करण्यात आले. सिडकोचे अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत विकासकामांना प्राधान्य या भूमिकेतून ही विकासाची कामे सुरू होत आहेत.
Tags
पनवेल