परप्रांतीय नारळासह सरबत विक्रेत्यांनी अडवल्या शासनासह हॉस्पिटल परिसरातील मोक्याच्या जागा

परप्रांतीय नारळासह सरबत विक्रेत्यांनी अडवल्या शासनासह हॉस्पिटल परिसरातील मोक्याच्या जागा*
पनवेल दि.३० (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिके मार्फत अतिक्रमण मोहीम सर्वत्र चालू असताना पनवेल शहरात या मोहिमेला अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी अनेक परप्रांतीयांसह नारळासह सरबत विक्रेत्यांनी शासनासह हॉस्पिटल परिसरातील मोक्याच्या जागा अडवल्याने तीव्र संताप पनवेलकरांनी व्यक्त केला आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायाला अतिक्रमण विभाग तातडीने कारवाई करते तर या परप्रांतीयावर का मेहरबानी असा सवाल पनवेलकर करीत आहेत.


या फेरीवाल्यांनी मुख्यतः नारळपाणी वाल्यांनी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुका पोलीस ठाणे समोरील शासकीय जागा, विविध रुग्णालय परिसर तसेच तहसीलदार कार्यालय परिसर, गुणे हॉस्पिटल, प्राचीन हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, पनवेल कोर्ट मुख्य समोरील फुटपाथवर, तक्का येथे जाणाऱ्या बायपास रोडवर, दुर्गामाता मंदिर शेजारी या ठिकाणी परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. या नारळविक्रेत्यांमध्ये बांगलादेशी असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांच्या कागदपत्रांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.थोडे नवीन जरा जुने