पारगावच्या ग्रामपंचायत वतीने ग्रामपंचायत निधीतून लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटपपारगावच्या ग्रामपंचायत वतीने ग्रामपंचायत निधीतून लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप
पनवेल दि.०१ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षात ग्रामपंचायत निधीतून १५ टक्के मागासवर्गीय खर्चातून पारगाव गावातील अनुसूचित जाती मधील बौद्ध समाजासाठी लग्न मंडपात लागणारे सर्व साहित्य तसेच अनुचित जमाती मधील कोली आदिवासी वाडीत आदिवासी समाजासाठी समाज मंदिरात सौर ऊर्जा बसवण्यात आली तसेच ग्रामनिधीतून ५% अपंग निधीतून व्यवसाय वाढीसाठी व प्रोत्साहन अनुदान सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या हस्ते देण्यात आले आहे. 


                   पारगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षात ग्रामपंचायत निधीतून गुरुनाथ नाईक, अनंता नाईक, आशा नाईक, विश्वनाथ नाईक, किरण आवासकर, दूर्वा अनगोळकर, चरण तारेकर, कार्तिका तारेकर, लक्ष्मण वाघमारे, भाविका पाटील या लाभार्थ्यांना ग्रामनिधीतून 5% अपंग निधीतून व्यवसाय वाढीसाठी व प्रोत्साहन अनुदान, १५ टक्के मागासवर्गीय खर्चातून अनुसूचित जाती मधील बौद्ध समाजासाठी लग्न मंडपात लागणारे सर्व साहित्य तसेच अनुचित जमाती मधील कोली आदिवासी वाडीत आदिवासी समाजासाठी समाज मंदिरात सौर ऊर्जा सरपंच अहिल्याबाई बाळाराम नाईक यांच्या हस्ते बसवण्यात आली. यावेळी उपसरपंच सौ सुनंदा हरिभाऊ नाईक, ग्रुप ग्रामपंचायत पारगाव माजी उपसरपंच सौ निशा पाटील, सदस्य कल्पना तारेकर, सोनाली भोईर, माजी उपसरपंच मनोज दळवी, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल, माजी उपसरपंच अंजली कांबळे, विजय वाघे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव पाटील, समाजसेवक बाळाराम नाईक, राहुल कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने