आईसह मुलगा बेपत्ता

आईसह मुलगा बेपत्ता
पनवेल दि.०६ (संजय कदम) : उसर्ली खुर्द येथे आपल्या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता आईसह ४ वर्षीय मुलगा कोठेतरी निघून गेल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.    

 
 दर्शना गोरख जाधव असे या महिलेचे नाव असून तिचे वय २९ वर्षे, उंची ५.४ इंच, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा-उभट, बांधा मध्यम, कपाळावर टिकली, केस काळे मध्यम, अंगात नेसून पंजाबी ड्रेस, पायात चप्पल घातलेली आहे. 


 हि आपल्या चार वर्षीय मुलगा शिवांश ज्याची उंची २.५ इंच, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा उभट, बांधा मध्यम, केस काळे मध्यम, अंगात नेसून थ्री फोर- टीशर्ट, पायात शूज असे पेहराव असलेल्या मुलाबरोबर कोठेतरी निघून गेल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यांच्याबाबत कोणास काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार नवले यांच्याशी संपर्क साधावा.  थोडे नवीन जरा जुने