रिक्षावर जातो असे सांगून गेलेला इसम बेपत्ता

रिक्षावर जातो असे सांगून गेलेला इसम बेपत्ता
पनवेल दि १६ (वार्ताहर) : रिक्षावर जातो असे सांगून घराबाहेर पडलेला एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 


 अंकुश तुळशीराम खुटले (वय ४१) रा. देवत हा इसम मु. दुदरे गाव येथून बाहेर पडला त्याची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, बांधा मध्यम, केस काळे बारीक, डोळे काळे असून पायात काळी चप्पल व अंगात खाकी रंगाचा हाफ बाह्याचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी
 ०२२-२७४५२४४४ किंवा सहा. पोलीस उपनिरीक्षक मनोहर चव्हाण. यांच्याशी संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने