शिवसेना उरण उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त उरण शहर शाखेला दिली साऊंड सिस्टिम ची भेट


शिवसेना उरण उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त उरण शहर शाखेला दिली साऊंड सिस्टिम ची भेट
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी उरण उपतालुका संघटिका तथा कट्टर शिवसैनिक म्हणून सुपरिचित असलेल्या मनीषा नितीन ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले,


 यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मनीषा ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.वाढदिवसानिमित्त उपतालुका संगीता संघटिका मनीषा ठाकूर यांनी शिवसेना उरण शहर शाखेला साऊंड सिस्टिम ची भेट दिली, सदर भेट गटनेते गणेश शिंदे व संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे यांनी स्वीकारली  यावेळी गटनेते गणेश शिंदे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक महेश वर्तक, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष हुसेना शेख, निष्ठावंत शिवसैनिक नितीन ठाकूर व सायदा पठाण उपस्थित होते


थोडे नवीन जरा जुने