उरण येथे लुपीन डायग्नोस्टिक्स लॅबचे आ.महेश बालदी यांच्या हस्ते उदघाटन.


उरण येथे लुपीन डायग्नोस्टिक्स लॅबचे आ.महेश बालदी यांच्या हस्ते उदघाटन.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )भारतातील नामांकित लुपीन डायग्नोस्टिक्स लॅबच्या उरण केंद्राचे उद्घाटन उरणचे आमदार महेश बलदी यांच्या शुभहस्ते रविवारी दि.7 मे 2023 रोजी प्राईम प्लाझा,बालई रोड, उरण येथे अत्यंत उत्साहात पार पडले.सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगीं डॉ.सुरेश पाटील, उरण भाजपा तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण शहर भाजपा अध्यक्ष कौशिक शहा ,उरण नगरपालिका उपनगराध्यक्ष जैविन कोळी, हितेश शहा, हस्तीमल मेहता , अजित भिंडे , अभय घरत , राजेश कोळी,डॉ मनोज भद्रे, डॉ संजीव म्हात्रे,डॉ उदय घरत, डॉ घनश्याम पाटील,डॉ विकास मोरे,डॉ सत्या ठाकरे ,डॉ मंगेश डाके,डॉ अजय कोळी,लुपीन डायग्नोस्टीक्सचे एरिया मॅनेजर संदेश बऱ्हाटे व उरणमधील अनेक नामांकित डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.


उरणमधील रुग्णांना अत्यंत उत्तम दर्जाची रक्त तपासणी सेवा देण्यासाठी सदर केंद्र डॉ आरती म्हात्रे व डॉ हरिओम म्हात्रे यांनी उरण येथे चालू केले आहे.उरणच्या रूग्णांना सर्व प्रकारच्या रक्त ,लघवी, थुंकी व विशेष रक्त तपासणी सेवा उरण मध्ये योग्य दरांमध्ये उपलब्ध होणार आहेत.सदर लॅबमध्ये मोफत रक्त तपासणी शिबिराचे 14 मे ,28 मे, 4 जुन ,18 जुन रोजी आयोजन होणार आहेत.यामध्ये कोलेस्टेरॉल, थायरॉईड, शुगर, सी बी सी यापैकी कोणतीही एक टेस्ट मोफत केली जाणार असल्याची माहिती डॉ हरिओम म्हात्रे यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने