शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे..


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे..

दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्मा श्री संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली विजबिलामधील वाढीव अनामत रक्कम विरोधात मोर्चा ..कोकणातील जनता महापूर , कोविड महामारी , शेतीचे नुकसान , चक्री वादळ अशा अनेक संकटाना सामोरे जाऊन आता कुठे शेतकरी , जनता सावरली आहे. अशा अनेक संकटाना सामोरे जावे लागत असताना देखील कोकणातील नागरिक प्रामाणिकपणे विजबिल भरत असतात. मात्र नागरिकांना आता आलेल्या वीजबिलांमध्ये वाढीव अनामत रक्कम समाविष्ट करून बिले देण्यात आलेली आहेत .*तरी वाढीव अनामत रक्कम विजबिलांमध्ये समाविष्ट करून नागरिकांवर लादण्यात आलेल्या बिलांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्त्वाखाली तीनबत्ती नाका येथून मोर्चा काढण्यात आला. व वीजबिले पेटवून, घोषणा देऊन निषेध करण्यात आला.तसेच खेडमध्ये तहसीलदार , कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना वाढीव अनामत रक्कम रद्द करणे बाबत निवेदन देण्यात आले.सदर वेळी शिवसेना , युवासेना , महीला आघाडी तसेच शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने