घरफोडी करणाऱ्यास अटक

घरफोडी करणाऱ्यास अटक
पनवेल दि.१२ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील हेदूटणे येथील घरात चोरी करणाऱ्या चोराला पकडून रहिवाशांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी चोराविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


         मोहम्मद अहसान मोहम्मद इसामोल सब्जी फरोज (२२) याने दिगंबर राधाकांत झा यांच्या राहत्या घराची बाथरूमची खिडकीची काच काढली आणि त्याद्वारे घरात प्रवेश करून पाच हजारांचा मोबाइल आणि २ हजार १०० रुपये रोख रक्कम चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी पकडले.


थोडे नवीन जरा जुने