हप्ता उकळण्यासाठी दाम्पत्याचा तरुणावर चाकूने वार

हप्ता उकळण्यासाठी दाम्पत्याचा तरुणावर चाकूने वार

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्याकडून हप्ता उकळण्या एका दाम्पत्याने तरुणावर चाकूने वार केल्याचा प्रकार खारघर सेक्टर- ३६ मध्ये घडला होता. याप्रकरणी दोघा जणांविरोधात खारघर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.खारघर, सेक्टर- ३० मधील ओवे गावात राहणारा सऊद खालिद पटेल (२८) हा तरुण १० वर्षांपासून बॉक्स व पॉलिथिनच्या पिशव्या पुरवण्याचा व्यवसाय करतो. सऊद हा खारघर, सेक्टर- ३६ मध्ये पाण्याचे बॉक्स पोहोचविण्यासाठी रिक्षाने गेला होता. याच वेळी ओवे गावात राहणाऱ्या हफिजा शेखने सऊदकडे पाहून शिवीगाळ करून खारघर परिसरात पिशव्या विक्रीचा धंदा करायचा असल्यास दररोज एक हजार रुपये देण्याची मागणी केली होती तर हफिजाचा पती अर्षद शेखने सऊदच्या खिशातील पैसे तसेच कागदपत्रे असलेले पाकीट जबरदस्तीने काढून घेतले होते. या वेळी सऊदने त्याचे पाकीट परत देण्याची मागणी हफिजा, अर्षदकडे केली होती. त्याचा राग आल्याने हफिजाने दुकानातील फळ कापण्याचा चाकूने सऊदच्या कानाजवळ वार केले. डाव्या या प्रकारामुळे घाबरलेल्या सऊदने अडीच हजार रुपये देऊन दोघांच्या तावडीतून सुटका केली होती. तसेच रात्री उशिरा खारघर पोलिस ठाण्यात हल्लाप्रकरणी दोघांविरोधात तक्रार दाखल केली.


थोडे नवीन जरा जुने