रायगडमध्ये फेनेस्टा


रायगडमध्ये फेनेस्टा   

पनवेल(प्रतिनिधी) भारतातील सर्वात मोठे दारे व खिडक्यांचे ब्रॅंड आणि या विभागाच्या बाजारपेठेतील आघाडीचे लीडर फेनेस्टा यांनी आणखी एक शोरूम चालू करून त्यांच्या रिटेल विस्ताराला बळकटी दिली आहे. त्यानुसार अलिबाग मधील विद्यानगर येथे प्रिया सेल्स हे खास शोरूम उपलब्ध झाले आहे.   या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दर्जाच्या अॅल्युमिनियम खिडक्या व दरवाजे, यूपीव्हीसी खिडक्या व दरवाजे आणि अंतर्गत आणि डिझाईनर दरवाजे तेथे उपलब्ध आहेत. फेनेस्टाचे व्यवसाय प्रमुख साकेत जैनया लॉंच बाबत म्हणाले, “संपूर्ण देशात आमचा ठसा वाढवणे हा एक आनंददायी प्रवास आहे. गेल्या २० वर्षांमध्ये ग्राहकांना पूर्ण समाधान देण्यासाठी फेनेस्टाचे अथक प्रयत्न आणि आमच्या ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास यामुळे फेनेस्टामध्येवाढ झाली आहे. हे नवीन शोरूम म्हणजे आमचा ठसा रुंदावण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. फूटप्रिंट आणि वैयक्तिक प्राधान्यांवर आधारित निर्णय घेण्यापूर्वी लोकांना उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांचे विस्तृत पर्याय पाहण्याची संधी देते. फेनेस्टा शोरूम्स ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मार्केटलीडर म्हणून स्थान मिळवण्यात यशस्वीरित्या योगदान देत आहेत. भारतातील अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे, यूपीव्हीसी खिडक्या आणि दरवाजे आणि सॉलिड पॅनल दरवाज्यांच्या श्रेणींमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने ब्रॅंड आपला बाजारातील हिस्सा आणखी वाढवण्याचा आणि भविष्यात आपले नेतृत्व स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते पुढे म्हणाले,“हा आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे आणि आम्ही येत्याकाही वर्षांत वेगवान वाढीसाठी तयार आहोत. टीअर-२ आणि टीअर-३ बाजारपेठांमध्ये देखील आक्रमक विपणन धोरण, उत्पादनांची विविधता आणि जलद रिटेलचा विस्तार यांचे संयोजन आम्हाला आमचे ध्येय गाठण्यात मदत करेल. आमची विपणन धोरणे अशा प्रकारे तयार केली जातात की, ती ग्राहकांसाठी प्रतिबद्धता, शिक्षण आणि एक अनुभवात्मकखरेदी अनुभव निर्माण करतात.  भारतातील वैविध्यपूर्ण आणि अत्यंत तीव्र हवामानात उत्तम कामगिरी करावे यासाठी फेनेस्टा येथील उत्पादन प्रत्येक टप्प्यावर कठोर चाचण्या आणि गुणवत्ता तपासण्यांमधून जाते. सौन्दर्य व शैलीमध्ये तडजोड न करता ध्वनीरोधक, जलरोधक (पाऊस), धूळ माती संरक्षक इत्यादी वैशिष्ठ्यांसाठी फेनेस्टा उत्पादने देशभरातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक, इंटिरिअरडिझाईनर आणि वास्तुविशारदांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. 
थोडे नवीन जरा जुने