सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा शनिवारी पारितोषिक वितरण समारंभ





सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा शनिवारी पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल(प्रतिनिधी) शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या 'राज्यस्तरीय व रायगड




 जिल्हास्तरीय' या सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दिनांक ०३ जून) सायंकाळी ०५ वाजता मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
              छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. 




 वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या या सोहळ्याचा साहित्य प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, शैलेंद्र शिर्के, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.


                                              -----असे आहे बक्षिसांचे स्वरूप- 
 राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस ०१ लाख रुपये, व्दितीय क्रमाकांस ५० हजार तर तॄतीय क्रमाकांस ३० हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विशेषांकासाठी १५ हजार रुपये, बाळ साहित्य अंकासाठी ७५०० रुपये, उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी १५ हजार रुपये, उत्कॄष्ट कथा, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ठ मुखपृष्ठ व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी ०३ हजार रुपये त्याचबरोबर सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, तसेच रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, व्दितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तॄतीय क्रमाकांस १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि उत्कॄष्ट कथा, उत्कृष्ट कविता, व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी ०३ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.



थोडे नवीन जरा जुने