वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव








वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

पनवेल(प्रतिनिधी) अफाट लोकप्रियता असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आज (दि. ०२ जून ) ७२ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. 



       सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असेलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच समाजातील प्रत्येक घटकासाठी मदतीचा ओघ दिला आहे. वाढदिवसाचे निमित्त असले तरी वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील उतुंग व्यक्तिमत्व म्हणून दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सुपरिचित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, तसेच क्रीडा स्पर्धा अशी विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आली. 



राजकारणात असलेले नेते हे सर्वस्वी राजकारणावर अवलंबून असतात पण समाजकारणाचे भान ठेवून काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा राजकारण हा मूळ पिंड नसून समाजकारण हाच त्यांचा गाभा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने समाजसेवेचे व्रत सुरूच आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर महाराष्ट्र्राच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही अभिष्टचिंतनाला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले तसेच सर्वांचे प्रेम कायम राहू द्या, अशा शब्दात अपेक्षा व्यक्त केली. 
     आदित्यप्रिया संघ ठरला लोकनेते रामशेठ ठाकूर चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचा मानकरी 
लोकनेते रामशेठ ठाकूर चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचा कळंबोली येथील आदित्यप्रिया संघ विजेता रॉयल कळंबोली संघ उपविजेता ठरला. त्यांना अनुक्रमे ०२ लाख व ०१ लाख रुपये आणि भव्य चषक देऊन सन्मान करण्यात आला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमीत्त न्हावेखाडी क्रिकेट क्लब च्यावतीने लोकनेते रामशेठ ठाकूर चषक २०२३ या प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन न्हावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर आयोजित करण्यात आले होते. 



 दानशूर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७२ व्या वाढदिवसानिमीत्त सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत लोकनेते रामशेठ ठाकूर चषक २०२३ प्रकाशझोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा रंगली. या स्पर्धेत आदित्यप्रिया कळंबोली संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना २ लाख रुपये आणि भव्य चषक, रॉयल कळंबोली संघाने द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यांना १ लाख रुपये आणि भव्य चषक देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत मालिकावीर म्हणून रॉयल कळंबोली संघाच्या मयूर वाघमारे यांना दुचाकी आणि भव्य चषक, उत्कृष्ट फलंदाज रॉयल कळंबोली सांघाचे तुषार शर्मा यांना १० हजार आणि भव्य चषक, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आदित्य प्रिया कळंबोलीसंघाचे एम्ब्रोज खान यांना १० हजार आणि भव्य चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आदित्य प्रिया कळंबोली संघाचे फरदीन काझी यांना १० हजार आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. 



थोडे नवीन जरा जुने