विशाल मनोहर सावंत मित्र परिवाराच्या वतीने वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप


विशाल मनोहर सावंत मित्र परिवाराच्या वतीने वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप        

  

 पनवेल /प्रतिनिधी:विशाल मनोहर सावंत मित्र परिवार यांच्या विद्यमाने सावरसई येथील 200 विद्यार्थ्यांना वहया तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना उमरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शुभांगी मढवी यांनी सांगितले की,


विशाल मनोहर सावंत मित्र परिवार यांच्या व माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवले जातात.गरीब व गरजू मुले शिक्षणापासून राबविण्यात वंचित राहू नयेत या उद्देशानेच हा वहया वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


लॉकडाऊनच्या काळातही संयुक्तरित्या धान्य वाटप अनेक ठिकाणी करण्यात आले. तसेच महाड पूरग्रस्त भागात जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही विशाल मनोहर सावंत मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले.

आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना तात्काळ कशी मदत मिळेल यासाठी विशाल मनोहर सावंत मित्र परिवार नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळेस विशाल मनोहर सावंत, उमरोली ग्रामपंचायत सदस्य शुभांगी मढवी , मनसेचे शहर विभाग अध्यक्ष संदीप पाटील, नितीन शिंदे , आकाश घाटे , नरेश मढवी, धिरज कदम आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रिया फाऊंडेशनचे संदीप म्हात्रे,जितेंद्र पाटील , सागर कांबळे, जयेश मोरे, किरण पाटील,समीर मते,दिनेश चिंबोरे, दिलीप चिंबोरे, प्रणय दळवी आदींनी प्रयत्न केले.


थोडे नवीन जरा जुने