खारघरमध्ये विजेच्या धक्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू


खारघरमध्ये विजेच्या धक्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू

खारघर शहरात पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाच्या सुरवातीलाच धक्कादायक घटना समोर आली आहे. पथदिव्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाल्याने 6 बकन्या मृत्यूमुखी पडल्याची घटना खारघर येथे घडली आहे. या निम्मिताने पालिकेच्या विद्युत विभगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.खारघर सेक्टर 10 परिसरात शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास मटण विक्रीचे दुकान चालवणारा एक व्यावसायिक बकन्या घेऊन घरी निघालेलाअसताना पथ दिव्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे ही घटना घडली. या घटनेमुळे व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पावसाळ्यात विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असतात अशा वेळी काळजी घेणे आवश्यक असते. अशा वेळी पथदिव्यातून वाहणारा विद्युत प्रवाहाशी सपंर्क होऊ नये या करता प्रशासनाकडून खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र पालिकेच्या विद्युत विभागाच्या कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी घेतली नसल्यानेच हो दुर्घटना घडल्याचा आरोप करत पालिकेच्या कंत्राटदारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार असल्याची माहिती खारघर कॉलनी फोरमचे अॅड. बालेश भोजने यांनी दिली आहे.


थोडे नवीन जरा जुने