पीडितेच्या असहायतेचा फायदा घेऊन अत्याचार करणारा आरोपी गजाआड


पीडितेच्या असहायतेचा फायदा घेऊन अत्याचार करणारा आरोपी गजाआड 
पनवेल दि. ११ ( वार्ताहर ) : घरात आश्रय देऊन अत्याचार केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी खारघर येथील ३७ वर्षीय अन्वर बिस्मिला शेख याला अटक केली आहे. अन्वर त्याच्या कुटुंबासोबत खारघर गावातील हनुमान मंदिराजवळ राहत होता. अन्वरने पीडितेच्या असहायतेचा फायदा उचलून केलेल्या कृत्यामुळे खारघरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी अन्वरला बलात्कारप्रकरणी अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली. 


तीन दिवसांपूर्वी ३० वर्षीय पीडिता खारघर वसाहतीमध्ये नोकरीसाठी अन्वरला भेटली. त्या पीडितेला काम आणि भाड्याने घर मिळवून देतो असे आश्वासन देऊन तिला स्वतःच्या घरी अन्वरने आणले. संबंधित आरोपीने या पीडित बाबत स्वतःच्या पत्नीला घर मिळेपर्यंत ती घरातच राहील असे सांगून पीडितेला आश्रय दिला. मात्र मध्यरात्री कुटुंबातील झोपल्यावर पीडितेवर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगून अन्वरविरोधात गुन्हा दाखल केला.


थोडे नवीन जरा जुने