लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम, पनवेलकरांच्या सेवेत, अध्यक्षपदी ला. स्वाती गोडसे






लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम, पनवेलकरांच्या सेवेत,
अध्यक्षपदी ला. स्वाती गोडसे 

लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचा 
पहिलाच पदग्रहण समारंभ नुकताच गोखले हॉल पनवेल येथे एका शानदार समारंभात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. 3231 A 2 चे प्रांतपाल ला. मुकेश तनेजा तर विशेष अतिथी म्हणून माजी प्रांतपाल ला. मानेश्वर नायक, मेंबरशिप कमिटी चेअरमन ला. भरत दत्त उपस्थित होते. 
पनवेल लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. हेमंत ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. क्लब एक्स्टेंशन चेअरमन ला. संजय गोडसे यांनी क्लब स्थापनेचा उद्देश सांगितला. 



माजी प्रांतपाल ला. मानेश्वर नायक यांनी सरगम क्लब च्या सर्व नवीन सभासदांना शपथ दिली, मार्गदर्शन केले व अनेक समर्पक उदाहरणे देऊन लायनीझमचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, लायन्स इंटरनॅशनल ही जगातील सर्वांत मोठी एन. जी. ओ. आहे व या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करता येतील. 



मुख्य अतिथी प्रांतपाल ला. मुकेश तनेजा यांनी पनवेल लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. हेमंत ठाकूर, एक्स्टेंशन चेअरमन ला. संजय गोडसे, ला. सुयोग पेंडसे व गायडींग लायन ला. मदन गोवारी यांचे पनवेल सरगमचि स्थापना केल्याबद्दल कौतुक केले. सरगम क्लबचे सर्व सभासद विविध क्षेत्रात पारंगत असून पनवेल सरगम क्लब आपल्या कार्याने पनवेल परिसरात नाव उज्ज्वल करेल असा विश्वास ला. तनेजा यांनी व्यक्त केला.


ला. तनेजा यांनी क्लबचे नवीन अध्यक्ष ला. स्वाती गोडसे, सचिव ला. संविदा पाटकर, खजिनदार ला. अलकेश शहा, उपाध्यक्षा ला. मानदा पंडीत, सहसचिव ला. सुजया देशपांडे, सहखजिनदार ला. धवल शहा, संचालक ला. प्रेमेंद्र बहिरा, ला. जयेश मणियार ला. प्रशांत सागवेकर, ला. मोनाली आजगावकर, ला. सुनील देशपांडे, टेमर ला. साहिल भोईर व टेल ट्विस्टर ला. भक्ती पटवर्धन यांना आपल्या पदाची जबाबदारी सांगून शपथ दिली. 


ला. स्वाती गोडसे यांनी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की लायन्सइंटरनॅशनलचे साईट फर्स्ट, डायबेटिस,चाईल्ड कॅन्सर, पर्यावरण, ई. आठ महत्वाचे विषय असून आमचा क्लब यामध्ये कार्य करेलच शिवाय आमच्या क्लबच्या नावात सरगम असल्यामुळे संगित क्षेत्राशी निगडित विविध उपक्रम घेण्यात येतील. सरगम क्लबच्या सर्व सभासदांचे सहकार्य नेहमीच मिळेल व सर्वांच्या सहकार्याने आमचा क्लब विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे पनवेल व लायन्स डिस्ट्रिक्ट मध्ये नाव उज्वल करेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला



. लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम च्या उपक्रमाची सुरुवात तक्का शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना डेस्ककीट देऊन करण्यात आली.
या समारंभास डिस्ट्रिक्ट मधून विविध पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
विशेष अतिथी ला. मानेश्वर नायक यांचा परिचय ला. सीताराम चव्हाण यांनी तर प्रमुख पाहुणे ला. मुकेश तनेजा यांचा परिचय ला. सुयोग पेंडसे यांनी केला 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. अशोक गिल्डा यांनी केले तर आभार प्रदर्शन ला. नंदकिशोर धोत्रे यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने