युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त द्रोणागिरी शहरात युवासेनेचे नामफलकाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते अनावरणयुवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त द्रोणागिरी शहरात युवासेनेचे नामफलकाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते अनावरण

उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) युवासेनाप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी द्रोणागिरी शहरांमध्ये युवासेनेच्या नामफलकांचे अनावरण शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.


 यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी आपला वाढदिवसाला कुठलीही बॅनरबाजी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपला वाढदिवस हा पर्यावरण पूरक वृक्षारोपण, सामाजिक व शैक्षणिक कार्य करून साजरा कराव असा त्यांचा विनंती कार्यकर्त्यांनी केलेले होते .त्यांच्या विनंतीला मान देऊन आज युवासेनेने द्रोणागिरी शहरात प्रत्येक सेक्टरमध्ये युवासेनेचे नामफलकाचे अनावरण केले आहे. द्रोणागिरी शहरांमध्ये शिवसेनेचे कार्य अतिशय चांगले चाललेले आहे व अशाच पद्धतीने यापुढे कार्य करत रहा असे मनोहरशेठ भोईर यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे व द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजक द्रोणागिरी युवासेना शहरप्रमुख करण पाटील यांनी मनोहरशेठ भोईर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. सदर कार्यक्रमास द्रोणागिरी शहर संघटक किसनशेठ म्हात्रे, संपर्कप्रमुख कल्पेश पाटील, महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, सुरेखा भोईर, चेतनाली पाटील, उरण शहराचे शहर संघटक महेश वर्तक, आवरे युवासेना अधिकारी अमित म्हात्रे,जेष्ठ कार्यकर्ते नितीन ठाकूर, द्रोणागिरी शहर सचिव धनंजय शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील,फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भोईर तसेच सर्व सेक्टर मधील शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने