पनवेल दि.२६ (संजय कदम) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुक्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या देवदूतांचा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नावडे तळोजा उपकेंद्र येथे सत्कार करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्याअंतर्गत सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे वायरमेन यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवदुताची उपमा दिली होती. अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या देवदूतांचा सत्कार रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील व शिवसेनेचे पनवेल तालुक्यातील पदाधिकारी यांच्या शुभहस्ते नावडे तळोजा उपकेंद्र येथे प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर, नावडे शाखा सहाय्यक अभियंता निलेश बुकटे, प्रधान तंत्रज्ञ गोपाल बारी, गणेश पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ संदेश खुटले, चंद्रशेखर रंगारी, सचिन वरवटकर, तंत्रज्ञ भाऊसाहेब राठोड, शेख अझरूद्दीन, विद्युत सहाय्यक सुरज वैराळे, आशिष राठोड, ओमकार गायकर, पुष्पराज चौधरी, आकाश पाटील, भुषण पाटील, बाह्यस्त्रोत्र कर्मचारी हरी भोपी, म्हात्रे मामा, जितू पाटील, भरत निघुकर, संतोष पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यकमाचे आयोजन तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी केले होते
. यावेळी उपतालुकाप्रमुख शांताराम कुंभारकर, तळोजा उपशहर प्रमुख हरेश पाटील, विभागप्रमुख प्रमोद पाटील, सुनील पाटील, उप विभागप्रमुख विष्णू भोईर, रवींद्र फडके, उपशहरप्रमुख तुलशिराम मुकादम, शाखाप्रमुख परशुराम गायकर, युवासेना विभाग चिटणीस शंकर देशेकर, शाखाप्रमुख मोहोदर एकनाथ सिनारे, मा. सरपंच दिलीप पाटील, शाखाप्रमुख महेंद्र पाटील, विष्णूशेठ ढोंगरे, काशिनाथ पाटील, नंदू म्हात्रे, परशुराम पाटील, उप शाखाप्रमुख वासुदेव पाटील, सुरेश पाटील, गट प्रमुख भरत पाटील आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल