उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहर शाखेतर्फे मोफत आरोग्य शिबीर

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहर शाखेतर्फे मोफत आरोग्य शिबीर
पनवेल दि.२६ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहर शाखाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. शिवसैनिक त्यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मातोश्री निवासस्थानी शिवसैनिक जमा होतात मात्र यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वाढदिवसाला कोणीही मातोश्री निवासस्थानी येऊ नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.


 तसंच या दिवशी कोणते तरी सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरच्या वतीने २७ जुलै रोजी सेक्टर १ येथील शाखेत सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मधुमेह, रक्त दाब आदी तपासण्या करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कळंबोली शाखाप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांनी केले आहे. 


थोडे नवीन जरा जुने