रस्त्यासाठी खर्च केलेले दोन कोटी गेले पाण्यात
रोडपाली येथील उड्डाणपुलावर सतत खड्डे पडत असल्याने सिडको महामंडळाने दोन कोटी रुपये खर्च करुन नूकताच नवीन काँक्रीटचा रस्ता बांधला.
मात्र गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. तेव्हा दोन कोटी रुपये गेल्या पाण्यात गेल्याची प्रतिक्रीया उद्योजकांची संघटना असणा-या तळोजा मॅन्युफॅक्चर असोशिएशनने (टीएमए) दिली आहे.
Tags
पनवेल