बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी समिती
इरसाळवाडीच्या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. या गावांतील 43 कुटुंबातील 229 लोकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून अद्यापही 86 नागरिकांचा शोध कार्य सुरु आहे.
सदर घटनेमध्ये आपले नातेवाईक गमावल्याने स्थानिक नागरिकांवरती मोठा मानसिक आघात झाला आहे, त्यामुळे नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण काही नागरीक समोर आलेले नाहीत. तरी इरसाळवाडी गावांतील नागरिकांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यांत आली आहे.
Tags
पनवेल