गुंतवणूकदारांसाठी सावधानतेचा इशारा


गुंतवणूकदारांसाठी सावधानतेचा इशारा

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) शेयर बाजारात सूचक, खात्रीलायक, गॅरंटीड लाभ देणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी देऊ केलेल्या कोणत्याही अशा योजना किंवा उत्पादनाला सबस्क्राईब करू नका कारण अशाप्रकारे शेयर बाजारात योजना/उत्पादने आणण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आलेला आहे, अशी माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडून देण्यात आली आहे.           "हिमांशू ठक्कर" नावाची, "न्यू यॉर्क लाईव्ह ट्रेड" नावाच्या कंपनीशी संबंधित असलेली, "९६६२०९६६२०" या मोबाईल क्रमांकामार्फत काम करणारी व्यक्ती शेयर बाजारात गुंतवणुकीवर खात्रीलायक/गॅरंटीड परतावा देत आहे. मात्र याठिकाणी गुंतवणूकदारांना सावधान राहण्याचा इशारा आणि असा सल्ला देण्यात येत आहे की, शेयर बाजारात सूचक/खात्रीलायक/गॅरंटीड लाभ देणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी देऊ केलेल्या कोणत्याही अशा योजना/उत्पादनाला सबस्क्राईब करू नका कारण अशाप्रकारे शेयर बाजारात सूचक/खात्रीलायक/गॅरंटीड लाभ देणाऱ्या योजना/उत्पादने आणण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. याची देखील नोंद घ्यावी की, सदर व्यक्ती/कंपनी ही नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची सदस्य किंवा कोणत्याही नोंदणीकृत सदस्यांची अधिकृत व्यक्ती नाही. एक्स्चेंजने “https://www.nseindia.com/invest/find-a-stock-broker” या लिंकखाली "नो/लोकेट युअर स्टॉक ब्रोकर" ही सुविधा वेबसाईटवर दिलेली आहे, त्याठिकाणी नोंदणीकृत व्यक्ती आणि त्यांच्या अधिकृत व्यक्तींचे तपशील तपासता येतात. याच लिंकखाली ट्रेडिंग सदस्यांनी एक्स्चेंजला कळविलेले, गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यासाठी/गुंतवणूकदारांना पैसे अदा करण्यासाठीची नेमून देण्यात आलेली बँक खाती देखील क्लायन्ट बँक अकाउंट्स म्हणून नमूद करण्यात आली आहेत. कोणत्याही कंपनीसोबत व्यवहार करताना हे तपशील जरूर तपासावेत असा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने