खारघरमधून ६ लाख ३० हजारांचे अंमली पदार्थ जप्त; २ जण ताब्यातखारघरमधून ६ लाख ३० हजारांचे अंमली पदार्थ जप्त; २ जण ताब्यात
पनवेल दि.०४ (संजय कदम) : तळोजा फेज 1 येथील मेट्रो शेड समोरील चायनिज सेटर समोरील गामी रोडवर अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केली असून त्यांच्या कडून ६ लाख ३० हजारांचे अंमली पदार्थ जप्त केले

.     
 नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांना खारघर परिसरात काही जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने तळोजा फेज 1 येथील मेट्रो शेड समोरील चायनिज सेटर समोरील गामी रोडवर एम. डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीकरीता बाळगुन असताना आरोपी गणी अब्बास शेख (वय 35, रा.खारघर), आणि अतिक चौधरी (वय 32, रा. खारघर) या दोघांना ताब्यात घेतले. पथकाने त्यांच्याकडून ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त केले. त्यांच्या विरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. ऍक्ट कलम 8 (क), 22 (क), 29 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने