पनवेल दि.०४ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालीकेच्या आरोग्य विभागाचे गोडवूनचे शटर उचकटून आत असलेले लाखो रुपये किमतीचे किटकनाशक रसायन अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पनवेल शहरातील जेष्ठ नागरीक संघ हॉलचे पाठीमागील बाजुस असलेले पनवेल महानगरपालीकेच्या मालकीचे आरोग्य विभागाचे गोडवूनमध्ये असलेले १ लाख ११ हजार ८६४ रुपये किमतीचे CYFLUTHRIN नावाचे किटकनाशकाचे ६ बॉक्स अज्ञात इसमाने चोरून नेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ करीत आहेत.
Tags
पनवेल