टेम्पोच्या सायलन्सरची चोरी
पनवेल दि.१३ (संजय कदम) : रस्त्यालगत पार्क करून ठेवलेल्या दोन टेम्पोमधील महागड्या सायलन्सरची अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी वस्तुच्या साहयाने कापुन नेल्याची घटना कारंजाडे परिसरात घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मेहुल ठक्कर यांनी त्यांच्या मालकीचा मारूती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी टेम्पो (एमएच ४६ बीएम ७४३१) करंजाडे सेक्टर आर ३ येथील साईशिवम आर्केड इमारतीच्या मेनगेटच्या रस्त्यालगत पार्क करून ठेवला होता. मात्र अज्ञात इसमाने कोणत्यातरी वस्तुच्या साहयाने टेम्पोमधील ३५ हजार रुपये किमतीचा सायलेन्सर कापुन नेला. तसेच शशिकांत मुंडकर यांच्या सुपर कॅरी टेम्पो (एम ४६ बीयु २०९३) याचा सायलन्सर देखील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार करीत आहेत.
Tags
पनवेल