आकुर्ली परिसरात आढळला बेवारस मृतदेह

आकुर्ली परिसरात आढळला बेवारस मृतदेह
पनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील आकुर्ली परिसरात एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. खान्देश्वर पोलीस सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.    सदर इसमाची उंची ५ फुट असून डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी काळी पांढरी वाढलेली, मिशा काळया पांढ-या वाढलेल्या, अंगाने मध्यम, रंग सावळा असा त्याचा वर्णन आहे. सदर इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास खान्देश्वर पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार नवनाथ नरळे यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने