पनवेल दि.०२ (संजय कदम) : लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी त्यांना अभिवादन केले.
लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिका आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक कृती समितीच्या वतीने मुंबई येथे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी उपस्थिती दर्शवत लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांना अभिवादन केले. दरम्यान महापुरुषांच्या विरुद्ध अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचा पनवेल येथे सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित केला गेला होता. या मोर्चामध्ये स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी सहभागात घेत संभाजी भिडे यांचा निषेध व्यक्त केला.
Tags
पनवेल