वळवली गावालगत असलेले सर्व्हे नंबर ४९ मधील जागा कोणत्याही परिस्थितीत बिल्डरच्या घशात घालून देणार नाही
वळवली गावालगत असलेले सर्व्हे नंबर ४९ मधील जागा कोणत्याही परिस्थितीत बिल्डरच्या घशात घालून देणार नाही - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हासंपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांचा सिडकोला इशारा पनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील वळवली गावालगत असलेले सर्व्हे नंबर ४९ मधील जागा कोणत्याही प्रकारे बिल्डरच्या घशात न घालता आदिवासी बांधव व स्थानिक वळवली ग्रामस्थ यांच्यासाठी गरजेपोटी घरे बांधण्यासाठी राखून ठेवण्यात यावी किंवा ज्या कामासाठी सिडकोने पनवेल तहसिल कार्यालयाकडून घेतली त्या कामासाठीच वापर करावा असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्ह्यासंपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सिडकोला दिला आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन बबनदादा पाटील यांनी सिडको उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना दिले आहे.              बबनदादा पाटील यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सर्व्हे नं. ४९ बाबत वेगवेगळया वर्तमान पत्रामध्ये बातमी आली असून त्या बाबत सिडको संचालक मंडळामध्ये प्रस्ताव मंजुर केल्याचे समजते. परंतु ब-याच वर्षापासून स्थानिक आदिवासी तेथे राहत असून तेथे उपजिवीकेचे साधन म्हणून शेती, भाजीपाला याची लागवड करून आपले उदरनिर्वाह करत आहेत. तसेच सदर जमिन ही वळवली गावालगत असून वळवली गाव हे सिडको संपादीत असून गावठाण विस्तारासाठी सदर जागा राखून ठेवण्यात यावी. तसेच कोणत्याही प्रकारे सदर सर्व्हे नं४९ ही जागा बिल्डरच्या घशात न घालता आदिवासी बांधव व स्थानिक वळवली ग्रामस्थ यांच्यासाठी गरजेपोटी घरे बांधण्यासाठी राखून ठेवण्यात यावी किंवा ज्या कामासाठी सिडकोने पनवेल तहसिल कार्यालया कडून घेतली त्या कामासाठी वापर करण्यात अशी मागणी बबनदादा पाटील यांनी सिडकोला निवेदनाद्वारे केली आहे.


थोडे नवीन जरा जुने