आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन







आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 
शनिवारी पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम 
पनवेल (प्रतिनिधी) कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नाद्ब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने शनिवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 



         मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, भजनसम्राट रायगड भूषण ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, सिडको युनियनचे सेक्रेटरी जे. टी. पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, ह. भ. प. नंदकुमार कर्वे यांची उपस्थिती लाभणार आहे. 



         या कार्यक्रमात प्रख्यात गायक रायगड भूषण उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर नंदकुमार कर्वे तर तबल्यावर महेश कानोले साथ देणार आहेत. तर 'सूर नवा ध्यास नवा' फेम गायिका रश्मी मोघे यांचे उपशास्त्रीय गायन होणार असून त्यांना हार्मोनियमवर सिद्धार्थ जोशी, तबल्यावर किशोर पांडे, पखवाजवर मधुकर धोंगडे, साईट रिदम विशाल वाघमारे आणि झांजवर जगदीश म्हात्रे यांची साथ असणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांच्या अभंगवाणीने होणार असून त्यांना वसंतशेठ पाटील, शंकर म्हात्रे, नारायणबुवा पाटील, कृष्णा पवार, मोतीराम कडू, जितेंद्र म्हात्रे, मछिंद्र पाटील व नाद्ब्रम्ह साधना मंडळ शिष्य परिवाराची साथ लाभणार आहे. या कार्यक्रमाचा संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक अक्षय चौधरी व वैभव चौधरी यांनी केले आहे. 




लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा 
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व बँडमिंटन असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने उलवा नोड मध्ये दिनांक ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट पर्यंत "रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी २०२३" या बँडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
      खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा व उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व बँडमिंटन असोसिएशन ऑफ रायगड यांच्या वतीने अनेक उपक्रमे राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उलवा नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हि स्पर्धा होणार असून ११, १३, १५ व १७ वर्षाखालील मुले आणि मुली गटात तसेच महिला व पुरुष खुला गट अशा प्रकारात होणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना चार लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकास सन्मानचिन्ह व पारितोषिक रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 



शनिवारी पनवेलमध्ये 'गीतरामायण'
पनवेल(प्रतिनिधी) कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्यावतीने शनिवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०६ वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत ' गीतरामायण' कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 
          पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले असून मोफत प्रवेशिका मा. नगरसेवक नितीन पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय, लोंढे खानावळ आणि अमोल खेर स्टेशनरी टिळक रोड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी केले आहे. 


थोडे नवीन जरा जुने