होंडा सिटीला अपघात 2 ठार









होंडा सिटीला अपघात 2 ठार
पनवेल, दि.12 (संजय कदम) ः पनवेल जवळील जेएनपीटीवर जाणार्‍या लेनवर नगिना ढाब्याच्या समोर होंडा सिटी गाडीला अपघात होवून यात गाडीतील दोघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे.



होंडा सिटी गाडी क्र.एमएच-01-बीजी-2188 ही घेवून चैतन्य फडाळे (25) रा.सानपाडा हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जेएनपीटीवर जाणार्‍या लेनवर नगिना ढाब्याच्या समोर होंडा सिटी चालवत जात असताना सदर गाडीला अपघात होवून या अपघातात स्वतः चैैतन्य फडाळे व त्याच्या सोबत असलेली दृष्टी खाडे (24 रा.भांडूप) ही गंभीररित्या जखमी होवून तिचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने