गणेशोत्सवापूर्वी मनपा क्षेत्रातील रस्ते खड्डे मुक्त करा- महादेव वाघमारे शेकाप कार्याध्यक्ष, पनवेल महापालिका क्षेत्र








गणेशोत्सवापूर्वी मनपा क्षेत्रातील रस्ते खड्डे मुक्त करा- महादेव वाघमारे शेकाप कार्याध्यक्ष, पनवेल महापालिका क्षेत्र
पनवेल दि.१२(संजय कदम): पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासंदर्भात शेकापचे पनवेल महापालिका कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी  आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.


        पनवेल महानगरपालिका हद्दीतील, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर या वसाहतींमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हे रोड सुस्थितीत नसतानाही केवळ मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने ते हस्तांतरित करून घेतले. मात्र अद्याप रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. महापालिका सिडकोला पत्र देते आणि प्राधिकरण तुमच्याकडे बोट दाखवते अशी एकंदरीत परिस्थिती आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. 





वाहने चालवणे जिकरीचे बनले आहे. दुचाकी चार चाकी चे नुकसान होत आहे. तर रोज लहान-मोठे अपघातही येथे घडतात.डांबराने खड्डे बुजवणे आवश्यक आहे एकीकडे आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा गाजावाजा सुरू केला आहे. परंतु दुसरीकडे रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था आहे. यामुळे बाप्पा यंदाही सांभाळून घ्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी असून गणरायांच्या आगमनापूर्वी जर रस्ते खड्डे मुक्त झाले नाही तर 18 सप्टेंबर पासून महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करणार असा इशारा निवेदाद्वारे दिला आहे. तसचे हे खड्डे गणशोत्सवापूर्वी भरण्याची मागणी केली आहे. या निवेदनाची पत्र सहायक पोलीस आयुक्त पनवेल परिमंडळ-2, वरीष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर,  आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा पनवेल शहर यांनाही देण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने