आयफोन १५ सिरीज खरेदीचा पहिला मान मिळवा क्रोमामध्ये




पनवेल, नवी मुंबई (प्रतिनिधी) क्रोमा स्टोअर्समध्ये आयफोन १५ खरेदी करण्यासाठी केवळ दोन हजार रुपयात प्री बुकिंग करता येणार असून २४ महिन्यांपर्यंत 

नो कॉस्ट ईएमआय आणि इतर अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहेत. पूर्ण पेमेंट करणाऱ्याला डिस्काउंट मिळणार आहे. अँपलच्या 

लेटेस्ट आयफोन १५ सिरीजचे भारतात आगमन झाले असून मोबाईल फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. १५ सप्टेंबरपासून क्रोमा स्टोअर्समध्ये आणि croma.com या वेबसाइटवर आयफोन १५ साठी प्री बुकिंग करता येणार आहे. आयफोन १५ सिरीज, अँपल वॉच सिरीज ९ आणि 

अँपल वॉच अल्ट्रा २ ही गॅजेट्स २२ सप्टेंबर पासून क्रोमामध्ये उपलब्ध असतील. क्रोमा स्टोअर आणि croma.com वर पहिल्या चार 


दिवसांमध्ये आयफोन १५ ची बुकिंग करणाऱ्यांना कॉर्डेलिया क्रुझवर होणाऱ्या क्रोमा क्रूज कंट्रोल या सोहळ्यासाठी तिकीट जिंकण्याची संधी मिळणार आहे. २१ सप्टेंबर पर्यंत सर्व स्टोअर्स आणि वेबसाईटवर प्रीबुकिंग सुरू राहील. याशिवाय प्रीबुकिंग करणाऱ्यांना क्रोमाद्वारे ठराविक शहरांमध्ये 

एक्सप्रेस डिलिव्हरीचाही लाभ मिळेल. ही सेवा इतर इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सकडे मिळत नाही. २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयची 

सुविधा, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या खरेदीवर ऑफर्स, ०६ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट, ०५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक अशा विविध ऑफर्स असणार आहेत.

 


 


थोडे नवीन जरा जुने