इसम बेपत्तापनवेल दि.३०(वार्ताहर): मी माझ्या जीवाचे बरे वाईट करीन असे बोलून एक इसम राहत्या घरातून कोठे तरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.       सतीश वसंत फडके(वय २३ रा. सांगटोळी) रंग गोरा, उंची ५ फूट, केस काळे असून अंगात हिरव्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट व हिरव्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. सोबत मोबाईल फोन आहे. या इस्माबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४५२४४४ किंवा पोलीस हवालदार मनोज तांडेल फोन नं. ९७०२७३३३५६ येथे संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने