मुबई - पुणे द्रुतगती महामार्गावर पीक अप ने घेतला पेट; गाडीतील सामानाची राखमुबई - पुणे द्रुतगती महामार्गावर पीक अप ने घेतला पेट; गाडीतील सामानाची राख
पनवेल दि.३०(वार्ताहर): मुबई - पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुबईच्या दिशेने चाललेल्या महेंद्र पीक अप वॅनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगी मुळे महामार्गावरून मुबई कडे जाणारी वाहतूक काही वेळा साठी ठप्प झाली होती , या आगी मध्ये पीक अप वॅन जळून खाक झाली असून वॅन मधील सामान देखील जळाले आहे. तसेच वाहन चालक सुखरूप बचावला आहे.       मुबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पीक अप वॅन क्रमांक MH १२ TV 1503 मध्य रात्री पुण्या हुन मुबई कडे निघाली होती, या वेळी गाडी मध्ये फ्रंटलाईन कुरियचा माल होता, ही गाडी मुबई पुणे महामार्गावरील मुबई च्या दिशेने असलेल्या किमी ४५ जवळ आल्या नंतर गाडीचा वाहन चालक कमलेश यादव यांनी गाडी बाजूला थांबवली, कारण गाडीच्या बोनेट मधून धूर येऊ लागला होता, धूर पहिल्या नंतर गाडीतून उतरून यादव यांनी बोनेट उघडले असता शॉक सर्किट होऊन इंजीन जवळ आग लागली होती, हे पहिल्या नंतर यादव याने गाडीतील पार्सल बॉक्स उतवरण्यास सुरवात केली मात्र यादव एकटा असल्याने केवळ 21 बॉक्स तो उतरवू शकला, त्या नंतर काही सेकंदातच आगीने रुद्र रूप धारण करून, गाडीला विळखा घातला आणि गाडी अग्नीच्या भक्ष्य स्थिनी पडली या मध्ये गाडी सह गाडीतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.


थोडे नवीन जरा जुने