महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक गौरागणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीरमहात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक गौरागणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर
पनवेल दि.३०(संजय कदम): पनवेल शहरातील भाजी मार्केट येथील सुप्रसिद्ध अश्या महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक गौरागणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबराचे आयोजन सोमवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.  के.गो.लिमये वाचनालय आणि ग्रंथालय, भाजी मार्केट पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथे जमा होणारे रक्त हे कॅन्सरग्रस्त व थैलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या मदतीकरीता टाटा मेमोरीअल सेंटर, खारघर यांच्या सहकार्याने जमा करण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी महादेव खराते मो. ९३२२३७९४१४ व अमोल साखरे मो.९३२४३७२१६६ येथे संपर्क साधावा. यावेळी प्रत्येक रक्दात्यास मार्केटच्या राजाची प्रतिमा व त्वरित दर्शन देण्यात येणार असल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे. 


थोडे नवीन जरा जुने