दुकानातील खिडकीचे गज कापून रोख रक्कम केली लंपास
पनवेल दि.०३(संजय कदम): पनवेल शहरातील टपाल नाका येथील एका दुकानाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
येथील सुवर्णशील अपार्टमेंट मध्ये प्रेम ट्रेडिंग कंपनीचे दुकान असून सदर दुकानाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने सुमारे ३५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे
. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यापरिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांचे पथक अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
Tags
पनवेल