पनवेल दि.०३(संजय कदम): तालुक्यातील कोल्ही कोपरचा राजा सार्वजनिक गौरा गणपती उत्सवाला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट देऊन या राजाच्या चरणी ते नतमस्तक झाले. यावेळी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, उपसरपंच सुनंदा हरिभाऊ नाईक, महेंद्र दत्तात्रय नाईक, हरिभाऊ नाईक, मा. उपसरपंच तथा सदस्य मनोज दळवी, पद्माकर नाईक, अनिल नाईक, हितेश रामभाऊ नाईक, साहिल जनक नाईक, ओंकार अमृत भोईर, सुजल शरद नाईक आदींसह मंडळाचे पदाधीकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने विविध मंडळांची भजने व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Tags
पनवेल